लंडन :  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याने १२८ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला मजबूत स्थिती आणले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मधील ही पहिली सेंच्युरी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लड कर्णधार इयॉन मॉर्गन याने टॉस जिंकून बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हस याला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. 


बांगलादेशची सुरूवात संथ झाली. परिस्थितीचा आढावा घेत तमीमने नंतर आपला नैसर्गिक खेळ केला. त्याने १४२ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांसह १२८ धावांची शानदार खेळी केली. 


तमीम ४४ षटकात जलदगतीने धावा काढण्याच्या नादात प्लंकेटच्या गोलंदाजीवर जोरात फटका मारत असताना चेंडू बॅटेची कड घेऊन उंच गेला. त्यात जॉश बटलर याने कोणतीही चूक न करता अचूक झेल पकडला.